
कल्याणमधील मटण-चिकन विक्रेत्यांचा आक्रमक मोर्चा
कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनी मटण आणि चिकन विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढल्याने खळबळ उडाली. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या मटण-चिकन विक्रेत्यांनी महापालिकेच्या मुख्यालयावर जोरदार मोर्चा काढला. हातात जिवंत कोंबड्या घेऊन विक्रेत्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी कोंबड्या फेकल्या
शेकडो विक्रेत्यांनी एकत्र येत महापालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी महापालिकेच्या आवारात कोंबड्या फेकल्या. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विक्रेत्यांचा इशारा
महापालिकेने मटण-चिकन विक्रीवरील बंदीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. जर निर्णय मागे घेतला नाही, तर 15 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयासमोर मटण-चिकन विक्री करण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणी आणखी तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.
Gallery

Comments